वन्यजीवांच्या सहवासात राहण्यासाठी आपण खूप सारी जंगल पालथी घालतो. परंतु असे बरेच वन्यजीव आहेत जे नेहमी आपल्या सहवासात राहत असतात. आपल्या घराभोवती उडणारे शिंजीर, बुलबुल, चिमणी, दयाळ यासारखे रोज दिसणारे पक्षी आणि आपल्या आसपास उडणारी फुलपाखरं हे देखील वन्यजीवच आहेत. आता हे कोणाकोणाला पचनी पडणार नाही. 'आम्ही तर रोज बघतो हे पक्षी, चिमणी तर आमच्या घरात येऊन उडून जाते. मग काय आमच्या घरात वन्यजीवांचा वावर आहे?' अशीच साधारण प्रतिक्रिया असेल परंतु आपल्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये आपल्या आसपास असणारे सर्वच प्राणी पक्ष्यांना ( काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्राणी वगळून ) वन्यजीव अस घोषित करून त्यांना या कायद्याचं संरक्षण देखील दिलं गेलंय. शेवटी या सगळ्या प्राण्यांचा उगम हा वनातूनच. आणि त्यांचे निसर्गातील स्थान ही तितकेच महत्वाचे, तरी पण यातले काही आपल्याला रोज दिसणारे असतात म्हणून त्यांना आपण विशेष वन्यजीव असा दर्जा देण्याच्या मानसिकतेत नसतो. मात्र यात एक खास अपवाद ठरतो तो म्हणजे साप! जो नेहमी...