Skip to main content

Posts

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...
Recent posts

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

सापांच्या शोधात...आंबा घाट

                       वन्यजीवांच्या सहवासात राहण्यासाठी आपण खूप सारी जंगल पालथी घालतो. परंतु असे बरेच वन्यजीव आहेत जे नेहमी आपल्या सहवासात राहत असतात. आपल्या घराभोवती उडणारे शिंजीर, बुलबुल, चिमणी, दयाळ यासारखे रोज दिसणारे पक्षी आणि आपल्या आसपास उडणारी फुलपाखरं हे देखील वन्यजीवच आहेत. आता हे कोणाकोणाला पचनी पडणार नाही. 'आम्ही तर रोज बघतो हे पक्षी, चिमणी तर आमच्या घरात येऊन उडून जाते. मग काय आमच्या घरात वन्यजीवांचा वावर आहे?' अशीच साधारण प्रतिक्रिया असेल परंतु आपल्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये आपल्या आसपास असणारे सर्वच प्राणी पक्ष्यांना ( काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्राणी वगळून ) वन्यजीव अस घोषित करून त्यांना या कायद्याचं संरक्षण देखील दिलं गेलंय. शेवटी या सगळ्या प्राण्यांचा उगम हा वनातूनच. आणि त्यांचे निसर्गातील स्थान ही तितकेच महत्वाचे, तरी पण यातले काही आपल्याला रोज दिसणारे असतात म्हणून त्यांना आपण विशेष वन्यजीव असा दर्जा देण्याच्या मानसिकतेत नसतो. मात्र यात एक खास अपवाद ठरतो तो म्हणजे साप! जो नेहमी...

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

नवरंग

                         ' निसर्ग म्हणजे विविध रंगांची उधळण' हे काव्यात्मक वाक्य आपण खूप ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं असेल. निसर्गात काही प्राणी, पक्षी, फळ, फुलं ही खास त्यांच्या रंगांसाठी प्रसिद्ध असतात. पण जेव्हा हे सारे रंग एकत्र येतात तेव्हा जे दृश्य असते ते खूपच मनमोहक ठरते. इंद्रधनुष्य, मोरपंख हे सगळं काही आपल्या मनावर बिंबायला हेच सूत्र तर कारणीभूत आहे. पक्षी आणि फुलपाखरं ही तर जणू निसर्गातल्या सगळ्या रंगांचे प्रतिनिधीच भासतात. हिरवा पोपट, काळी मैना अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. यावरूनच पोपटी, मोरपंखी अश्या काही रंगांची नाव प्रचलित झालेली  आहेत. असाच अजून एक पक्ष्यांच्या जगतातील रंगांचा आविष्कार म्हणजेच ' नवरंग '. घाबरलेल्या अवस्थेत अंगणात असलेला नवरंग           या पक्ष्याची आठवण होते आणि लिहावस वाटलं त्याच कारण अस की कोल्हापूर शहरात मिळालेलं त्याच अस्तित्व. काही दिवसांपूर्वी मला माझे परिचित श्री. राबाडे यांचा फोन आला. साधारण दुपारचे बारा वाजले असतील....

महिमतगड...

                                                     साधारण सकाळचे दहा वाजले, तेव्हा आम्ही गडावर पोहोचलो. थोडी नजर खाली करून बघितलं तर कळलं की काल बस मधून उतरल्या उतरल्या जे डोंगराचे कडे दिसत होते त्यावरच हा गड आपले अस्तित्व राखत उभा आहे. (या गडाच्या नावात खूप गोंधळ होतो काहीजण महिमतगड उल्लेख करतात तर बऱ्याच लेखात आणि गुगल मॅपवर महिमानगड असा उल्लेख आढळतो.) मी सोबत आणलेल्या साप पकडायच्या अाकड्याने साप तर पकडला नाही पण चढताना अधीमधी त्याचा टेकू म्हणून वापर मात्र नक्की झाला. थोड पुढे आल्यावर मामा म्हणाले, " हा गडाचा मेन दरवाजा" थोडेफार दगडी बांधकामाचे अवशेष होते तिथे. त्यातल्याच एका दगडावर सकाळी ऊन खात पडलेली एक घोरपड आमची चाहूल लागताच दगडाच्या कपारीत गायब झाली. तिथून पुढे जाताना त्या कपारीत पुन्हा एकदा वाकून बघायला मी विसरलो नाही.              कधी काळी मावळ्यांच आणि शिवाजी महाराजांच्या स्व...