साधारण सकाळचे दहा वाजले, तेव्हा आम्ही गडावर पोहोचलो. थोडी नजर खाली करून बघितलं तर कळलं की काल बस मधून उतरल्या उतरल्या जे डोंगराचे कडे दिसत होते त्यावरच हा गड आपले अस्तित्व राखत उभा आहे. (या गडाच्या नावात खूप गोंधळ होतो काहीजण महिमतगड उल्लेख करतात तर बऱ्याच लेखात आणि गुगल मॅपवर महिमानगड असा उल्लेख आढळतो.) मी सोबत आणलेल्या साप पकडायच्या अाकड्याने साप तर पकडला नाही पण चढताना अधीमधी त्याचा टेकू म्हणून वापर मात्र नक्की झाला. थोड पुढे आल्यावर मामा म्हणाले, " हा गडाचा मेन दरवाजा" थोडेफार दगडी बांधकामाचे अवशेष होते तिथे. त्यातल्याच एका दगडावर सकाळी ऊन खात पडलेली एक घोरपड आमची चाहूल लागताच दगडाच्या कपारीत गायब झाली. तिथून पुढे जाताना त्या कपारीत पुन्हा एकदा वाकून बघायला मी विसरलो नाही.
कधी काळी मावळ्यांच आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच अस्तित्व या गडावर होत याची प्रत्येक निशाणी मामा आम्हाला दाखवत होते. गडावर प्रचंड प्रमाणात वनराई आणि त्यामध्ये लपलेली भवानी देवीच मंदिर, मारुतीची दगडी कोरीव मूर्ती हे सर्व पाहत पाहत आम्ही सातवीत शिकलेला शिवरायांचा इतिहास आठवत होतो. गडाचे पूर्वेकडील बुरुज हे सुस्थितीत दिसत होते. गडावर दोन बांधीव तलाव होते पण त्यात पाणी काही दिसलं नाही. भवानी मातेच्या मंदिरासमोर दोन तोफा आम्हाला दिसल्या. जोशी सर म्हणाले, "अरे , आपण एक काम करू या तोफा अशाच गवतात पडलेत त्यांना किमान दगडावर तरी ठेवून देवू." आम्ही आमच्या बॅग मंदिरासमोर ठेवून मोठे दगड घेऊन आलो. त्या तोफेचे तोंड थोड वर होईल अशी त्याची मांडणी केली. इतिहासाचे साक्षीदार असे बेवारस पडलेले पाहून थोड दुःख तर झालाच होत पण या अश्या शिवकालीन वस्तू आम्ही स्वतः हाताळत होतो आणि ते ही चांगल्या आदरपूर्वक भावनेने हे आमच्यासाठी भलतंच आनंददायी होत. सरांनी आपल्या कॅमेरा ने आमचा त्या तोफांसोबत एक ग्रुप फोटो काढला, तोच आमच्यातल्या एकाने जोरात "छत्रपती शिवाजी महाराज की" अशी घोषणा दिली सुध्दा. त्या घोषणेला ' जय ' असा जोरदार प्रतिसाद देत आम्ही किल्ल्याच्या पुढच्या भागात येऊन पोहोचलो.
किल्ल्यावरील शंकराचे मंदिर आणि त्या समोरचा उघड्यावर असलेला नंदी पाहून आम्ही बालेकिल्ल्याच्या पायथ्याला आलो तिथून अजून एक डोंगर सोडून थोडा बाहेर आलेला एक सुंदर बुरुज आम्हाला दिसला. बालेकिल्ला म्हणजे ती गडावरची सगळ्यात उंच जागा होती आणि तिथे एक ध्वजस्तंभ होता. परंतु तिथून आसपासच संपूर्ण प्रदेश दिसत होता. दूरवरच्या खेडी आणि त्यांना जोडणारे रस्ते आम्ही गरुडच्या नजरेनेच पाहत असल्याचा भ्रम काही वेळ आम्हाला झाला, पण थोड्याच वेळात तो तुटला कारण त्याचवेळी आमच्या डोक्यावर गरुडाची एक जोडी आमच्यापेक्षा ही किती तरी वर उडताना दिसत होती. त्या गरुडाने पुन्हा एकदा मानवी मर्यादांची जाणीव मला करून दिली होती.
दुपारी जेवणासाठी पुन्हा शाळेतच सोय केलेली होती. येताना मात्र आम्ही कच्चा रस्ता पकडून कुंडी गावाकडे आलो. जेवण झाल्यावर मामांचा निरोप घेऊन आम्ही बस स्टॉपकडे निघालो. "पुन्हा या बाळांनो" अस म्हणत मामाने पण आम्हाला हात दाखवला. देवरुखवरून आलेली बस फिरून देवरुखला जाणार होती त्यात आम्ही बसलो. बस सुटली, अजूनही महीमतगडाचे कडे दिसत होते. चोवीस तासापेक्षाही कमी वास्तव्य असलेल्या या गावातील जंगलाने जे मला शिकवले ते अद्भुत होते. या ट्रेकमध्ये आम्ही एकही मोठा प्राणी किंवा साप पाहिला नाही परंतु जंगल म्हणजे काही ठरावीक मोठ्या प्राण्यांच घर नसून किती तरी अनोळखी वन्यजीवांची ती दुनिया आहे हे लक्षात आले होते. तेथील सर्व वनस्पती आणि इतर जीवांचा अभ्यास करायचं ठरवल तर एक आयुष्य पुरणार नव्हतं. पण आहे ते आयुष्य या मानवी जगतापासून दूर वन्यजीवांच्या सहवासात व्यतीत करण्याचा निर्धार नकळत माझ्या मनाने कधी केला हे मला पण समजले नाही.
बस वळण घेत वाड्या वस्त्या पार करत होती आणि मी खिडकीला टेकून आठवत होतो ते... रानकोंबडीची लगबग..., बिबट्याची विष्ठा..., जळूंची वळवळ..., लपणारी घोरपड... आणि उंच उडणारी गरुडाची जोडी.......
- Chetan Kokatnur

Waiting for another adventure 😍😍
ReplyDeleteLavakarach
DeleteFabulous❣️💥...
ReplyDeleteप्रत्यक्षात मी या गडावर गेलो नाहीये पण आज तुमच्या मुळे थोडी सफर झाली...
धन्यवाद...
Ekatra nakki jau
Deleteखूप छान 👍🏻
ReplyDeleteThank you
DeleteWish you will travel the entire world and keep sharing your adventurous travelling moment with us👍
ReplyDeleteTumhi pn ya sobat😊
Delete