' निसर्ग म्हणजे विविध रंगांची उधळण' हे काव्यात्मक वाक्य आपण खूप ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं असेल. निसर्गात काही प्राणी, पक्षी, फळ, फुलं ही खास त्यांच्या रंगांसाठी प्रसिद्ध असतात. पण जेव्हा हे सारे रंग एकत्र येतात तेव्हा जे दृश्य असते ते खूपच मनमोहक ठरते. इंद्रधनुष्य, मोरपंख हे सगळं काही आपल्या मनावर बिंबायला हेच सूत्र तर कारणीभूत आहे. पक्षी आणि फुलपाखरं ही तर जणू निसर्गातल्या सगळ्या रंगांचे प्रतिनिधीच भासतात. हिरवा पोपट, काळी मैना अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. यावरूनच पोपटी, मोरपंखी अश्या काही रंगांची नाव प्रचलित झालेली आहेत. असाच अजून एक पक्ष्यांच्या जगतातील रंगांचा आविष्कार म्हणजेच ' नवरंग '. घाबरलेल्या अवस्थेत अंगणात असलेला नवरंग या पक्ष्याची आठवण होते आणि लिहावस वाटलं त्याच कारण अस की कोल्हापूर शहरात मिळालेलं त्याच अस्तित्व. काही दिवसांपूर्वी मला माझे परिचित श्री. राबाडे यांचा फोन आला. साधारण दुपारचे बारा वाजले असतील....