जळूंच्या भीतीने सगळी मुलं शांतच चालत होती. वाटेत येणारे पक्षांचे आवाज ऐकत आम्ही थोडा चढ चढत होतो. तेवढ्यात आमच्यातला एक मुलगा पाठीमागून ओरडलाच, " सर, जळू...जळू". सगळीच थांबलो आम्ही. त्याच्या पायावर एक जळू चिकटला होता. तो पाय जोरजोराने झटकू लागला, सर बोलले, "अरे थांब काढू तरी दे" सरांनी त्याचा पाय धरला आणि एका पानात धरून तो जळू ओढून काढला. तस त्या जागेवरून त्याच रक्त घळाघळा वाहू लागलं. एवढासा जीव केवढ रक्त काढलं त्याने त्या पोराचं. तेवढ्यात मामा मागे आले "काय नाही व्हत त्याला, आम्हाला अंगभर लगत्यात तसली," सरांकडे बघत पुढे बोलत, " सर वढून कशाला काढला, तंबाखू व्हती की माझ्याकडं थोडी लावली की लगेच सोडत ते" सर म्हणाले, " होय का, आम्हाला माहीतच नव्हतं, ह्यो नाचायला लागला मग काय करायचं, आणि मामा तुम्ही तंबाखू खाता आम्हाला काय माहीत?," सरांनी मामाची थोडी फिरकी घेत हसतच बोले. "गावात कोण तंबाखू खात नाही? उगाच पोरांसमोर नको म्हणून मळली नाही मगापासून ". अस मामा म्हणाले. चांगले विचार होते मामाचे...असो. त्यांचं हे बोलणं आणि जळू काढायचा कार्यक्रम चालू होता तेव्हा प्रत्येक जण आपापल्या पायाला काही लागलंय का ते तपासत होता. बॅग खाली ठेवली तर त्यावर जळू चढतील या भीतीने कसरतच सुरू होती सर्वांची.
जळूचा समावेश ‘अॅनिलिडा’ (वलयांकित) संघाच्या ‘हिरुडिनिया’ या वर्गात होतो. पावसाळ्यात तर हा हमखास जंगलात आढळतो परंतु पावसाळा संपला तरी काही दिवस जमिनीमध्ये ओल असू पर्यंत त्याचे अस्तित्व असते. अतिशय लवचिक असणारा या जीवाच्या दोन्ही टोकाला चुषक असते. अधर बाजूला तोंड असते. एकाद्या प्राण्याला चिकटला की तो तोंडावाटे 'हिरुडीन' नावाचा स्त्राव स्त्रवतो ज्यामुळे तो भाग बधीर होतो आणि तेथील रक्त गोठत नाही त्यामुळे तो सहज रक्त शोषून घेतो. बधीर झाल्यामुळे आपल्याला जळू लागला आहे याची जाणीव पण होत नाही. पण तेव्हा मामानी जळू काढण्यासाठी जी पद्धत सांगितली होती ती अशास्त्रीय आहे, कारण अश्यामुळे जळू आपल्या शरीरात उलटी करण्याची शक्यता असते ज्याने संसर्ग होऊ शकतो.
थोडा वेळ चालत आम्ही थोड उंचीवर आलो. वाटेच्या एका बाजूला डोंगराचा उतार होता. गाव आणि रस्ता पण अधूनमधून दिसत होता. कोरडे पडलेले झरे पार करत आम्ही जवळपास गडाच्या अगदी जवळ येऊन पोहचलो होतो. मोकळी जागा आणि बसायला थोडी दगड सुद्धा होती. सर बाटलीतील पाण्याने हात धुत म्हणाले," चला इथे बसून न्याहारी करून घेऊ आणि मग गडावर जाऊ, काय मामा?" मामा पण हातातल्या पिशवीला खाली ठेवून त्यातला पोहेचा डबा काढत बोलले, " व्हय इथून पुढं किल्लाच सुरू हाय, खावा मग."
चालून थोडी दमलेली आम्ही सगळी आपापली ताट घेऊन मामाकडे जाऊ लागलो. आता मोठी झाड नव्हती, छोटी छोटी झुडप आणि त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं बघत बघत आमचा पोहेवर ताव सुरू झाला...

- Chetan Kokatnur

We are getting more and more knowledge about the jungle as story goes forward.....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery Informative 👌👍
ReplyDeleteउत्साह आणि उत्कंठावर्धक...🙌👌
ReplyDeleteThank you
DeleteJungle ट्रेक by staying home धमाल मस्ती
ReplyDelete👍👍
Deleteछान
ReplyDeleteJungle story being interesting now.
ReplyDeleteThank you
ReplyDeleteJalu baddal mahiti milali..
ReplyDeleteHo...toch uddesh ahe ... thank you
DeleteKhup chan👌👌
ReplyDeleteThis story is not only giving us knowledge of forest but also creating intrest towards Environment.
ReplyDeleteThanking you so much Sir 😇