Skip to main content

जळू...


                     जळूंच्या भीतीने सगळी मुलं शांतच चालत होती. वाटेत येणारे पक्षांचे आवाज ऐकत आम्ही थोडा चढ चढत होतो. तेवढ्यात आमच्यातला एक मुलगा पाठीमागून ओरडलाच, " सर, जळू...जळू". सगळीच थांबलो आम्ही. त्याच्या पायावर एक जळू चिकटला होता. तो पाय जोरजोराने झटकू लागला, सर बोलले, "अरे थांब काढू तरी दे" सरांनी त्याचा पाय धरला आणि एका पानात धरून तो जळू ओढून काढला. तस त्या जागेवरून त्याच रक्त घळाघळा वाहू लागलं. एवढासा जीव केवढ रक्त काढलं त्याने त्या पोराचं. तेवढ्यात मामा मागे आले "काय नाही व्हत त्याला, आम्हाला अंगभर लगत्यात तसली," सरांकडे बघत पुढे बोलत, " सर वढून कशाला काढला, तंबाखू व्हती की माझ्याकडं थोडी लावली की लगेच सोडत ते" सर म्हणाले, " होय का, आम्हाला माहीतच नव्हतं, ह्यो नाचायला लागला मग काय करायचं, आणि मामा तुम्ही तंबाखू खाता आम्हाला काय माहीत?," सरांनी मामाची थोडी फिरकी घेत हसतच बोले. "गावात कोण तंबाखू खात नाही? उगाच पोरांसमोर नको म्हणून मळली नाही मगापासून ". अस मामा म्हणाले. चांगले विचार होते मामाचे...असो. त्यांचं हे बोलणं आणि जळू काढायचा कार्यक्रम चालू होता तेव्हा प्रत्येक जण आपापल्या पायाला काही लागलंय का ते तपासत होता. बॅग खाली ठेवली तर त्यावर जळू चढतील या भीतीने कसरतच सुरू होती सर्वांची.
जळूचा समावेश ‘अ‍ॅनिलिडा’ (वलयांकित) संघाच्या ‘हिरुडिनिया’ या वर्गात होतो. पावसाळ्यात तर हा हमखास जंगलात आढळतो परंतु पावसाळा संपला तरी काही दिवस जमिनीमध्ये ओल असू पर्यंत त्याचे अस्तित्व असते. अतिशय लवचिक असणारा या जीवाच्या दोन्ही टोकाला चुषक असते. अधर बाजूला तोंड असते. एकाद्या प्राण्याला चिकटला की तो तोंडावाटे 'हिरुडीन' नावाचा स्त्राव स्त्रवतो ज्यामुळे तो भाग बधीर होतो आणि तेथील रक्त गोठत नाही त्यामुळे तो सहज रक्त शोषून घेतो. बधीर झाल्यामुळे आपल्याला जळू लागला आहे याची जाणीव पण होत नाही. पण तेव्हा मामानी जळू काढण्यासाठी जी पद्धत सांगितली होती ती अशास्त्रीय आहे, कारण अश्यामुळे जळू आपल्या शरीरात उलटी करण्याची शक्यता असते ज्याने संसर्ग होऊ शकतो. 
            थोडा वेळ चालत आम्ही थोड उंचीवर आलो. वाटेच्या एका बाजूला डोंगराचा उतार होता. गाव आणि रस्ता पण अधूनमधून दिसत होता. कोरडे पडलेले झरे पार करत आम्ही जवळपास गडाच्या अगदी जवळ येऊन पोहचलो होतो. मोकळी जागा आणि बसायला थोडी दगड सुद्धा होती. सर बाटलीतील पाण्याने हात धुत म्हणाले," चला इथे बसून न्याहारी करून घेऊ आणि मग गडावर जाऊ, काय मामा?"  मामा पण हातातल्या पिशवीला खाली ठेवून त्यातला पोहेचा डबा काढत बोलले, " व्हय इथून पुढं किल्लाच सुरू हाय, खावा मग."
चालून थोडी दमलेली आम्ही सगळी आपापली ताट घेऊन मामाकडे जाऊ लागलो. आता मोठी झाड नव्हती, छोटी छोटी झुडप आणि त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं बघत बघत आमचा पोहेवर ताव सुरू झाला...


- Chetan Kokatnur
   

Comments

  1. We are getting more and more knowledge about the jungle as story goes forward.....

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. उत्साह आणि उत्कंठावर्धक...🙌👌

    ReplyDelete
  4. Jungle ट्रेक by staying home धमाल मस्ती

    ReplyDelete
  5. Jungle story being interesting now.

    ReplyDelete
  6. This story is not only giving us knowledge of forest but also creating intrest towards Environment.
    Thanking you so much Sir 😇

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...