जंगल बुक मधील मोगलीच जंगल असो वा आपल्या आसपास असणार एखाद जंगल. हा शब्द लहानपणी वाघ सिंहाच्या गोष्टी ऐकताना जो कानावर पडतो अगदी तेव्हापासून त्याची ओळख आपल्याला होते. पुढे मग शाळेतील अभ्यास , पुराणातील कथा या माध्यमातून पुन्हा हा विषय अधूनमधून थोडासा स्पर्श करून जात असतो . पण जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला जातो, खास करून एखाद्या घाट रस्त्याने, तिथे मात्र शंभर टक्के आपली भेट या खऱ्याखुऱ्या जंगलाशी होते. विशेषतः प्रौढांपेक्षा लहानग्यांना जंगलाविषयी अधिक कुतूहल असते. जसं लहान लेकरांना आईचा लळा हा ते मोठे होण्याच्या तुलनेत अधिक असतो. खरंच आहे ते! जंगल हि सुद्धा आपली आईच आहे ना?
माझी पहिली नजर जंगलावर पडली आणि जंगल म्हणजे काय असतं ते मी पाहिलं गणपतीपुळे च्या प्रवासात... लहान म्हणजे अगदी चौथीत असताना कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला निघालो होतो. वाटेत आंबा घाट लागतो, कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात उत्तरेकडचा कोकणात उतरवायचा मार्ग.
सकाळच्या वळेस खोल दरीत दिसणारी गादी प्रमाणे फुलून टूम झालेली हिरवीगार वनराई म्हणजेच जंगल हे तेव्हाच कळले. पुढे गाडीतून प्रवास सुरू झाला पण माझ्या मनाची वाट तर जंगलाकडे निघाली होती...जी मी आयुषयभरासाठी निवडली होती. ज्या वाटेवर मला या अद्भुत जगतातील रहस्य उलगडत गेली....
अश्या गूढ आणि निसर्ग संपन्न पश्चिम घाटातील काही रहस्य आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत inside nature stories च्या माध्यमातून...
- Chetan Kokatnur

Nice write up Chetan. Aptly expressed. Keep writing... Keep sharing.
ReplyDeleteThank you sir
DeleteAwesome ...keep working
ReplyDeleteThank you
ReplyDeleteApt description.... Nice blog😳
ReplyDeleteThank you
ReplyDeleteVery creative..
ReplyDeleteGood Chetan, go on
ReplyDeleteThank you
Delete