Skip to main content

जंगल - पहिली नजर...


        जंगल बुक मधील मोगलीच जंगल असो वा आपल्या आसपास असणार एखाद जंगल. हा शब्द लहानपणी वाघ सिंहाच्या गोष्टी ऐकताना जो कानावर पडतो अगदी तेव्हापासून त्याची ओळख आपल्याला होते. पुढे मग शाळेतील अभ्यास , पुराणातील कथा या माध्यमातून पुन्हा हा विषय अधूनमधून थोडासा स्पर्श करून जात असतो . पण जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला जातो, खास करून एखाद्या घाट रस्त्याने, तिथे मात्र शंभर टक्के आपली भेट या खऱ्याखुऱ्या जंगलाशी  होते. विशेषतः प्रौढांपेक्षा लहानग्यांना जंगलाविषयी अधिक कुतूहल असते. जसं लहान लेकरांना आईचा लळा हा ते मोठे होण्याच्या तुलनेत अधिक असतो. खरंच आहे ते! जंगल हि सुद्धा आपली आईच आहे ना?
 
  
            माझी पहिली नजर जंगलावर पडली आणि जंगल म्हणजे काय असतं ते मी पाहिलं गणपतीपुळे च्या प्रवासात... लहान म्हणजे अगदी चौथीत असताना कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला निघालो होतो. वाटेत आंबा घाट लागतो, कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात उत्तरेकडचा कोकणात उतरवायचा मार्ग.
            सकाळच्या वळेस खोल दरीत दिसणारी गादी प्रमाणे फुलून टूम झालेली हिरवीगार वनराई म्हणजेच जंगल हे तेव्हाच कळले. पुढे गाडीतून प्रवास सुरू झाला पण माझ्या मनाची वाट तर जंगलाकडे निघाली होती...जी मी आयुषयभरासाठी निवडली होती. ज्या वाटेवर मला या अद्भुत जगतातील रहस्य उलगडत गेली....

अश्या गूढ आणि निसर्ग संपन्न पश्चिम घाटातील काही रहस्य आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत inside nature stories च्या माध्यमातून...
                         

 -  Chetan Kokatnur
                                                   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...