Skip to main content

ट्रेकिंग...


                    लहानपणी जंगलाबद्द्दल निर्माण झालेल्या कुतुहलाला खत पाणी घालायचं काम discovery सारख्या टीव्ही चॅनल्सनी चोख बजावल. अधून मधून शाळेतील भूगोल, पर्यावरण हे विषय पण काहीसे मदत करायचे. पण खरी मज्जा ही जंगलात फिरण्यात होती, जस टीव्हीवर ब्रेअर ग्रील्स फिरतो तस आणि ती संधी लवकरच मिळाली . शाळेतून एक मुक्कामी जंगल सहल आयोजित केली. जोशी सर जे संस्कृत शिकवायचे त्यांनी आम्हाला रत्नागरीतील कुंडी या गावी आपण जात असल्याचे सांगीतले.
                    ठरल्याप्रमाणे आम्ही वीसभर विद्यार्थी अगदी सकाळी कोल्हापूर बस स्थानकावर आलो. माझ्याकडे एक लोखंडी सळई होती जी मी टोकाला थोडी वाकवून घेतली होती. सापाचा आकडा  हो ! आजूबाजूची लोक पण माझ्याकडे कडे थोड्या वेगळ्या नजरने बघत होते खास करून माझ्या सापाच्या  आकड्याकडे... खरी गोष्ट हि होती की तो आकडा मी आदल्या रात्रीच बनवला होता आणि त्यापूर्वी मी कधीही सापाला स्पर्श पण केला नव्हता . पण टीव्ही इफेक्ट होता ना ट्रेकिंगला जाताना डोक्यात! त्याचाच परिणाम म्हणजे तो आकडा. अखेर देवरुखची बस मिळाली आम्ही सगळे गाडीत बसलो. मी भांडून खिडकी काबीज केली आणि वाटेत लागणाऱ्या आंबा घाटाची वाट बघत बसलो....
             दुपार झाली तेव्हा आम्ही देवरूखला पोहोचलो. तिथून अजून एका बसने कुंडी या गावला जायला निघालो. वाटेतली ती अस्सल कोकणी गाव बघत आम्ही तासाभरात कुंडीला पोहोचलो. कुंडी हे गाव खूपच सुंदर आणि टिपिकल कोकणी गाव होत. गावला तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगरांचे कडे अगदी सहज दिसत होते. आमचा मुक्काम एका शाळेत होता आणि शाळा गावाबाहेर. उंच डोंगराच्या कुशीत वसलेलं ते गाव आणि ती शाळा ही वाट पायी चालत जाताच एका खोल गंभीर जंगलाच्या शेजारी आम्ही येऊन थांबलो असल्याची जाणीव झाली होती. या जंगलाने मला जणू काही इथे ओढूनच आणल होत. काही वेळाने आम्ही सर्व जण त्याच्या कवेत जाणार होतो....
  

-  Chetan Kokatnur

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...