कुंडी गावाच्या थोड्या बाहेर असलेल्या शाळेत आमचा मुक्काम होता. त्याच गावातील एक मावशी आणि शाळेचा शिपाई यांनीच आमचं रात्रीच जेवण बनवलं. तश्या वातावरणात निव्वळ गरमागरम भात आमटी हे जेवण पण त्या वेळी वेगळीच चव देऊन गेलं.
जेवण झाल्यावर जोशी सर बोलले," चला रे, थोडा फेरफटका मारून येऊया बाहेर". तस आम्ही सगळे हातात ब्याटरी घेऊन लगेच शाळेच्या पटांगणात हजर...! आम्हाला रात्रीच अस त्या गावापासून दूर जाणाऱ्या रस्त्याने फिरणं पण रोमांचकारी वाटत होत. थोड पुढे चालत गेल्यावर सर म्हणाले, " बसुया का इथे थोडा वेळ?". आणि उत्तराची वाट न पहाता सर रस्त्यात मधोमध बसून गेले. आम्ही सगळे त्यांच्या भोवताली आणि मग गप्पा आणि जंगलाबद्दलच्या शंका सुरू झाल्या.
चारी बाजूंनी काळा कुट्टा अंधार होता. मोबाईल फोन तर तेव्हा फक्त सरांकडेच होता. त्यामुळे सगळे जण शंभर टक्के सरांकडे लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होती. तेवढ्यात जंगलाच्या बाजूने थोडासा चालू बंद होणारा प्रकाश मला दिसला तोच मी ओरडलो, "सर ते बघा! काही तरी आहे तिथे". तस सगळीच मुलं आणि सर देखील ताडकन उठून उभे राहिले. सुमारे अर्धा तास आम्ही तर्क लावत उभेच होतो पण एवढ्या रात्री जंगलात कोण जाईल हाच प्रश्न परत सगळ्या तर्काच्या शेवटी येत होता. काही मुले बोलली पण,' सर चला आपण जाऊया परत शाळेत झोपायला.' पण अमाच्यातली काही मुलं ते काय आहे हे माहिती करूनच जायचं या मतावर ठाम होती . त्यात आमची थोडी चुळबूळ सुरू होती. तोच सर ओरडले "थांबा रे, ती माणसाचं आहेत इकडेच येत आहेत ती ". थोड्या वेळाने ती लोक आमच्या जवळ आली. तिघे जण होते ते, त्यातल्या एकाच्या हातात एक पोत होत, त्यात थोडी हालचाल सुरू होती. आणि बाकी दोन लोकांच्या पाठीवर एक वेताच्या काठीपासून तयार केलेले बाणाच्या भात्यासारखे काही तरी होते. सरांनी त्यांना थोड्या ग्रामीण शैलीतच विचारलं , "काय काय हो काय पकडून आणला, आम्ही शाळेची सहल घेऊन आलोय कोल्हापूरहून तुमच्या गावात, मुलांना पण दाखवा की." त्यावर त्यांनी आपल्या हातातल्या ब्याटऱ्या सुरू करून पोत अर्धवट उघडून दाखवलं... ते बघून सरांची प्रतिक्रिया, "अरे बापरे! "
त्यात तर पंधरा वीस मोठे खेकडे वळवळत होते . त्यातला एक बोला, " वड्यातन पकडून आणलय रस्स्याला, नेतस का एक दोन उद्याच्या जेवणाला?" त्याची बोलण्याच्या लकबीने सगळीच हसू लागली आणि काही वेळापासून असलेले गंभीर वातावरण चटकन निवळले. त्यांच्यातल्या एकाला मी विचारलं, की हे पाठीवर काय आहे तुमच्या?
त्यावर तो मोठ्याने बोलला , " त्याला खून बोलतात इकडे...खून...खेकडाच जाळा असा ते, एक टाईम आत गेलो की परत बाहेर येत नाही त्यो." आम्ही सगळी आश्चर्याने त्या वस्तूकडे बघत होतो. त्यानंतर सरांनी त्यांच्याशी थोडी बातचीत केली आणि मग ती लोक "सांभाळून जावा उद्या फिरायला" अस बोलून निघून गेली. आम्ही पण चालत शाळेत आलो, रात्र खूप झाली होती सगळे जण झोपी गेले . सर आणि त्या लोकांचं बोलणं परत परत आठवत माझे डोळे हळूहळू मिटू लागले आणि कधी गाढ झोप लागली हे समजलच नाही...
- Chetan Kokatnur

Very Interesting....!
ReplyDeleteThank you 😊
Delete👍👍
ReplyDelete😊
Deleteउत्तम मांडणी...पुढचा भाग जाणून घेण्याची इच्छा झाले
ReplyDeleteThank you ...after two days.
DeleteNice writing.Let's have same incidents stories.
ReplyDeleteThank you
Deleteलै भारी मित्रा💥😍
ReplyDeleteलवकरच नवीन भाग येऊदे...
दोन दिवसात पुढील भाग येईल. धन्यवाद.
DeleteRememberd my school days, when we gone as same
ReplyDelete✌️✌️
DeleteInteresting 👌👌
ReplyDeleteThank you
DeleteNice writing bro....keep it up👍🏻
ReplyDeleteThank you dada...
DeleteKhup chan
ReplyDeleteAwesome story Sir..... I would so happy if we shall on such a adventure nature tour.
ReplyDeleteThank you...
DeleteIts getting interesting. Nice flow of writing. Good going.
ReplyDelete