Skip to main content

रात्रीचा मुक्काम

                   
                 
         
                          कुंडी गावाच्या थोड्या बाहेर असलेल्या शाळेत आमचा मुक्काम होता. त्याच गावातील एक मावशी आणि शाळेचा शिपाई यांनीच आमचं रात्रीच जेवण बनवलं. तश्या वातावरणात निव्वळ गरमागरम भात आमटी हे जेवण पण त्या वेळी वेगळीच चव देऊन गेलं.
‌                  जेवण झाल्यावर जोशी सर बोलले," चला रे, थोडा फेरफटका मारून येऊया बाहेर". तस आम्ही सगळे हातात ब्याटरी घेऊन लगेच शाळेच्या पटांगणात हजर...!  आम्हाला रात्रीच अस त्या गावापासून दूर जाणाऱ्या रस्त्याने  फिरणं पण रोमांचकारी वाटत होत. थोड पुढे चालत गेल्यावर सर म्हणाले, " बसुया का इथे थोडा वेळ?". आणि उत्तराची वाट न पहाता सर रस्त्यात मधोमध बसून गेले. आम्ही सगळे त्यांच्या भोवताली आणि मग गप्पा आणि जंगलाबद्दलच्या शंका सुरू झाल्या.
                चारी बाजूंनी काळा कुट्टा अंधार होता. मोबाईल फोन तर तेव्हा फक्त सरांकडेच होता. त्यामुळे सगळे जण शंभर टक्के सरांकडे लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होती. तेवढ्यात जंगलाच्या बाजूने थोडासा चालू बंद होणारा प्रकाश मला दिसला तोच मी ओरडलो, "सर ते बघा! काही तरी आहे तिथे". तस सगळीच मुलं आणि सर देखील ताडकन उठून उभे राहिले. सुमारे अर्धा तास आम्ही तर्क लावत उभेच होतो पण एवढ्या रात्री जंगलात कोण जाईल हाच प्रश्न परत सगळ्या तर्काच्या शेवटी येत होता. काही मुले बोलली पण,' सर चला आपण जाऊया परत शाळेत झोपायला.' पण  अमाच्यातली काही मुलं ते काय आहे हे माहिती करूनच जायचं या मतावर ठाम होती . त्यात आमची थोडी चुळबूळ सुरू होती. तोच सर ओरडले "थांबा रे, ती माणसाचं आहेत इकडेच येत आहेत ती ". थोड्या वेळाने ती लोक आमच्या जवळ आली. तिघे जण होते ते, त्यातल्या एकाच्या हातात एक पोत होत, त्यात थोडी हालचाल सुरू होती. आणि बाकी दोन लोकांच्या पाठीवर एक वेताच्या काठीपासून तयार केलेले बाणाच्या भात्यासारखे काही तरी होते. सरांनी त्यांना थोड्या ग्रामीण शैलीतच विचारलं , "काय काय हो काय पकडून आणला, आम्ही शाळेची सहल घेऊन आलोय कोल्हापूरहून तुमच्या गावात, मुलांना पण दाखवा की." त्यावर त्यांनी आपल्या हातातल्या ब्याटऱ्या सुरू करून पोत अर्धवट उघडून दाखवलं... ते बघून सरांची प्रतिक्रिया, "अरे बापरे! "
                      त्यात तर पंधरा वीस मोठे खेकडे वळवळत होते . त्यातला एक बोला, " वड्यातन पकडून आणलय रस्स्याला, नेतस का एक दोन उद्याच्या जेवणाला?" त्याची बोलण्याच्या लकबीने सगळीच हसू लागली आणि काही वेळापासून असलेले गंभीर वातावरण चटकन निवळले. त्यांच्यातल्या एकाला मी विचारलं, की हे पाठीवर काय आहे तुमच्या?
                          त्यावर तो मोठ्याने बोलला , " त्याला खून बोलतात इकडे...खून...खेकडाच जाळा असा ते, एक टाईम आत गेलो की परत बाहेर येत नाही त्यो." आम्ही सगळी आश्चर्याने त्या वस्तूकडे बघत होतो. त्यानंतर सरांनी त्यांच्याशी थोडी बातचीत केली आणि मग ती लोक "सांभाळून जावा उद्या फिरायला" अस बोलून निघून गेली. आम्ही पण चालत शाळेत आलो, रात्र खूप झाली होती सगळे जण झोपी गेले . सर आणि त्या लोकांचं बोलणं परत परत आठवत माझे डोळे हळूहळू मिटू  लागले आणि कधी गाढ झोप लागली हे समजलच नाही...
 

 - Chetan Kokatnur
   

Comments

  1. उत्तम मांडणी...पुढचा भाग जाणून घेण्याची इच्छा झाले

    ReplyDelete
  2. Nice writing.Let's have same incidents stories.

    ReplyDelete
  3. लै भारी मित्रा💥😍
    लवकरच नवीन भाग येऊदे...

    ReplyDelete
    Replies
    1. दोन दिवसात पुढील भाग येईल. धन्यवाद.

      Delete
  4. Rememberd my school days, when we gone as same

    ReplyDelete
  5. Nice writing bro....keep it up👍🏻

    ReplyDelete
  6. Awesome story Sir..... I would so happy if we shall on such a adventure nature tour.

    ReplyDelete
  7. Its getting interesting. Nice flow of writing. Good going.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...