Skip to main content

वेलकम टू जंगल...



                                 

                             अगदी पहाटे झोपेतून कोणीही न उठवता आयुष्यात पहिल्यांदा उठलो. परंतु मी लवकर उठलो याचा भ्रम काहीच वेळात मोडला. त्याच झालं अस की, बाहेर आवरायला गेलो तेव्हा पाहिलं सर तर केव्हाच उठून तयार होते आणि कालचे जेवण बनवणारे शिपाई मामा कढईत पोहे ढवळत होते. तरी आम्ही पटापट आवरून एखाद्या मोहिमेला सज्ज व्हावे तस शाळेच्या पटांगणात येऊन उभे राहिलो. शिपाई मामांनी पोहे एका डब्यात भरून घेतले आणि आणि आम्ही सगळे जण मोठ्या उत्साहाने शाळेच्या बाहेर पडलो.

मादी

नर

             साधारण सकाळचे सात वाजले असतील. पावसाळा संपला असला तरी त्याची ओल अजूनही जमिनीमध्ये होती. गाव सोडून आम्ही एका डोंगराच्या पायथ्याला आलो. वाटेत जंगलाची चाहूल देणारे हळद्या, जंगल मैना, सुर्यपक्षी, नारंगी डोक्याचा मशिमार हे किती तरी पक्षी दिसत होते. तेवढ्यात अचानक मामा ओरडले , "थांबा...थांबा". आम्ही लगेच सावध पवित्रा घेत थांबलो. "रान कोंबडी हाय बघा तिथ " आमची  चाहूल लागताच चुरूचुरू मोकळ्या जागेतून जंगलाच्या काठावरून आत शिरताना आम्ही सगळ्यांनी दोन कोंबड्या पाहिल्या. राखी रान कोंबडी हा पक्षी सकाळच्या वेळेस जंगलात हमखास मोकळ्या जागी आढळतो आणि पायाने पाला पाचोळा खुरडत राहण्याच्या सवयीने त्याचे अस्तित्व लगेच लक्ष वेधून घेते.  आपल्या पाळीव कोंबड्यांच्या आकाराचा असतो हा पक्षी. मादीच्या अंगावर राखी रंगाच्या ठिपक्यांची रचना असते तर नराचा लाल रंगाचा तुरा आणि विळ्याच्या आकाराची काळी तुकतुकणारी शेपूट ही खूप आकर्षक असते. आम्ही जसे जवळ जात होतो तसे या रान कोंबड्यांचा  कुकु....कु..हू... कू..... असा आवाज देखील तीव्र होत होता.  आता आम्ही बरोबर जंगलात आत शिरणाऱ्या एका वाटेच्या दिशेने जात होतो. तेवढ्यात मगापासून आमच्या पुढे चालणारे मामा थांबले आणि पाठीमागे आमच्याकडे तोंड करून बोलले" बघा पोरांनो आता इथून पुढं खर जंगल सुरु होतंय, कोंबडी न तर तुमचं स्वागत केलाच हाय. खर पुढं काय बी असू शकत. सकाळची वेळ हाय, गव पाण्याला गावात उतरलेली असत्यात. ( गवा रेडा हा प्राणी पाणी पिण्यासाठी गावाच्या आसपास येत असतो ) तवा यापुढ अजिबात आवाज करायचा नाय, माझ्यामागून गुमान या, काय दिसलं तर दाखवतो " अस बोलून मामा सरळ जंगलाच्या त्या अरुंद वाटेतून आत शिरले आणि आम्ही काही न बोलता गुपचूप मुंगीच्या रांगेप्रमाने त्यांच्या मागून चालू लागलो....



- Chetan Kokatnur

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...