अगदी पहाटे झोपेतून कोणीही न उठवता आयुष्यात पहिल्यांदा उठलो. परंतु मी लवकर उठलो याचा भ्रम काहीच वेळात मोडला. त्याच झालं अस की, बाहेर आवरायला गेलो तेव्हा पाहिलं सर तर केव्हाच उठून तयार होते आणि कालचे जेवण बनवणारे शिपाई मामा कढईत पोहे ढवळत होते. तरी आम्ही पटापट आवरून एखाद्या मोहिमेला सज्ज व्हावे तस शाळेच्या पटांगणात येऊन उभे राहिलो. शिपाई मामांनी पोहे एका डब्यात भरून घेतले आणि आणि आम्ही सगळे जण मोठ्या उत्साहाने शाळेच्या बाहेर पडलो.
मादी
नर
साधारण सकाळचे सात वाजले असतील. पावसाळा संपला असला तरी त्याची ओल अजूनही जमिनीमध्ये होती. गाव सोडून आम्ही एका डोंगराच्या पायथ्याला आलो. वाटेत जंगलाची चाहूल देणारे हळद्या, जंगल मैना, सुर्यपक्षी, नारंगी डोक्याचा मशिमार हे किती तरी पक्षी दिसत होते. तेवढ्यात अचानक मामा ओरडले , "थांबा...थांबा". आम्ही लगेच सावध पवित्रा घेत थांबलो. "रान कोंबडी हाय बघा तिथ " आमची चाहूल लागताच चुरूचुरू मोकळ्या जागेतून जंगलाच्या काठावरून आत शिरताना आम्ही सगळ्यांनी दोन कोंबड्या पाहिल्या. राखी रान कोंबडी हा पक्षी सकाळच्या वेळेस जंगलात हमखास मोकळ्या जागी आढळतो आणि पायाने पाला पाचोळा खुरडत राहण्याच्या सवयीने त्याचे अस्तित्व लगेच लक्ष वेधून घेते. आपल्या पाळीव कोंबड्यांच्या आकाराचा असतो हा पक्षी. मादीच्या अंगावर राखी रंगाच्या ठिपक्यांची रचना असते तर नराचा लाल रंगाचा तुरा आणि विळ्याच्या आकाराची काळी तुकतुकणारी शेपूट ही खूप आकर्षक असते. आम्ही जसे जवळ जात होतो तसे या रान कोंबड्यांचा कुकु....कु..हू... कू..... असा आवाज देखील तीव्र होत होता. आता आम्ही बरोबर जंगलात आत शिरणाऱ्या एका वाटेच्या दिशेने जात होतो. तेवढ्यात मगापासून आमच्या पुढे चालणारे मामा थांबले आणि पाठीमागे आमच्याकडे तोंड करून बोलले" बघा पोरांनो आता इथून पुढं खर जंगल सुरु होतंय, कोंबडी न तर तुमचं स्वागत केलाच हाय. खर पुढं काय बी असू शकत. सकाळची वेळ हाय, गव पाण्याला गावात उतरलेली असत्यात. ( गवा रेडा हा प्राणी पाणी पिण्यासाठी गावाच्या आसपास येत असतो ) तवा यापुढ अजिबात आवाज करायचा नाय, माझ्यामागून गुमान या, काय दिसलं तर दाखवतो " अस बोलून मामा सरळ जंगलाच्या त्या अरुंद वाटेतून आत शिरले आणि आम्ही काही न बोलता गुपचूप मुंगीच्या रांगेप्रमाने त्यांच्या मागून चालू लागलो....
- Chetan Kokatnur



छान
ReplyDeleteThank you
DeleteChan shabdankan!
ReplyDeleteThank you
DeleteSuperb! Grate job..keep it up
ReplyDeleteThank you 😊
DeleteBhari👌👌
ReplyDeleteThanks
DeleteInteresting Story
DeleteInteresting Story
Delete😳😳😳 excitement on its peek
ReplyDelete😁😁
Delete👌👌
Delete